🙏नमस्कार मित्रांनो ब्लॅक गोल्ड सिटी मध्ये तुमचा स्वागत आहे. आज आपण वारंवार विचारला जाणारा प्रश्न
१) कोविड-१९ चे दोन वेगवेगळ्या लस घेऊ शकतो का?
२) कोणत्या देशांमध्ये दोन वेगवेगळ्या लस देण्यात येत आहे?
असेच कित्येक प्रश्न तुमच्या मनात येतात , तर आज आपण या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहोत.
परिचय :-
भारतामध्ये कोरोना आल्यापासून यावर लस काढण्याकरिता वेगवेगळे प्रयोग आपल्या सायंटिस्ट द्वारे केल्या जात होते. त्यातूनच आपल्याला कोरोना ची लस बनवण्यात यश मिळाला. त्यामुळे कित्येक लोकांचा जीव वाचू शकला. परंतु इतक्या कमी कालावधीमध्ये कोरोना ची लस मिळणे हे खूप महत्त्वाची बाब आहे.
कारण की कोणतीही लस बनविण्याकरिता कमीत कमी पाच वर्षाचा कालावधी लागतो कारण त्यावर वेगवेगळे प्रयोग करून पहावे लागतात. त्यातूनच लसीचा आपल्यावर होणारा परिणाम व दुष्परिणाम याबद्दल आपल्याला माहिती मिळेते. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाच्या दोन लसीला emergency लसीकरणा करिता वापरण्यात येत आहे. ते म्हणजे Covaxin and Covishield.
आणखी एका लस भारत सरकारने इमर्जन्सी वापरा करिता मान्यता दिली आहे ती म्हणजे Sputnik v. ही लस लवकरच आपल्याला लसीकरणा करिता उपलब्ध होणार आहे.
👉१) दोन लस वेगवेगळ्या घेऊ शकतो का?
केंद्रने गुरुवारला म्हटल की कोविड-१९ ची दोन वेगवेगळया लस दिल्यास कोणताही विपरित परिणाम होत नाही. आणि तसेच यावर आणखी रिसर्च, एक ठाम उत्तर तसेच याची छाननी झाली पाहिजे हे PTI च्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला लस दिल्या जाता असेल तर त्याला दोन्ही लस सारखेच दिल्या पाहिजे असे म्हटले आहे.
नुकताच उत्तर प्रदेश मधील सिद्धार्थनगर यातील २० ग्रामस्थांना पहिला डोस हा कोविशिल्ड चा देण्यात आला व दुसरा डोस Covaxin चा चुकीने देण्यात आला. परंतु त्या लोकांमध्ये आता कोणतेही प्रतिकूल असे परिणाम सध्या दिसून आलेला नाहीत. या सिद्धार्थनगर कोविड-१९ लसीकरण केंद्रा वर चवकशी बसविण्यात आली आहे. त्या २० ग्रामस्थांना मॉनिटर केल्या जात आहे.
या घटना वर निती आयोगाचे सदस्य V.K paul म्हणतात की या घटनेची काटेकोरपणे चौकशी झाली पाहिजे व त्या लोकांची मॉनिटरिंग झाली पाहिजे. ते असेही म्हणतात की यावर आणखी अभ्यास करायला पाहिजे व एक ठाम उत्तर द्यायला पाहिजे. दोन वेगवेगळ्या लस एकत्र केल्या जाऊ शकतात असे सध्या सांगता येत नाही परंतु भविष्यात या पद्तीनुसार लस दिल्या जाईल की नाही हे international studies वर अवलंबिले आहे.
👉२) कोणत्या देशांमध्ये दोन वेगवेगळ्या लस देण्यात येत आहे?
काही देशांमध्ये जसे की Germany आणि फ्रान्सा इथे दोन वेगवेगळ्या लसी एकत्र देण्याचा अभ्यास केला जात आहे व त्यातून कोणता परिणाम मानवाच्या शरीरावर होतो हे बघितल्या जात आहे. या देशांमध्ये Covishield and pfizer/moderna लस काही लोकांमध्ये काही विशेष स्थितीमध्ये वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
👉घेतल्यास कितपत कार्यक्षम राहील ?
आतापर्यंतच्या केलेल्या अभ्यासावरून असे लक्षात आले की दोन वेगवेगळे लस दिल्यास त्या व्यक्तीची रोग प्रतिकारक्षमता वाढते. परंतु भारत सरकारने या प्रकारे लस लोकांमध्ये देण्याकरिता परवानगी दिलेली नाही.
👉Note:-
आम्ही असं म्हणत नाही कि दोन वेगवेगळ्या लस घेतल्यानंतर व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते. या बद्दल आम्हाला कल्पना नाही. परंतु भारतामध्ये Covaxin वर अशाप्रकारे कसलाही अभ्यास केलागेला नाही. यावर आणखी अभ्यास केला जात आहे त्यातूनच आपल्याला ठाम उत्तर मिळेल. म्हणून कोणीही नियमांचं उल्लंघन करू नये ज्या पद्धतीने लसीकरण घ्यायला सांगितले आहे त्या पद्धतीने लसीकरण घेताल्या पाहिजेत.
Dr.lalit kant म्हणतात की जेव्हा एका लसीचा तुटवडा होईल तेव्हा त्याऐवजी उपलब्ध असलेली लस दिल्या जाऊ शकते.
मला असे वाटते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉग तुमच्या पर्यंत पोचविणे करिता प्रेरित करतो.
👉तुमची बातमी प्रकाशित करण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटीचा प्रतिनिधी होण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटी च्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्या करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:-
Post a Comment