🙏 खाली दिलेली माहिती ऐकण्याकरिता वर दिलेल्या बटनवर क्लिक करा👆👆
🙏नमस्कार मित्रांनो मी अमित खेरकर तुमचं ब्लॅक गोल्ड सिटी मध्ये स्वागत करतो. आज आपण स्त्रीच्या जीवनातील महत्वाच्या घटकावर बोलणार आहोत ते म्हणजे मासिक पाळी.
आज आपण सर्व विज्ञानाच्या, आधुनिक काळाच्या, लिंग समानतेच्या युगात आहोत. परंतु आजही मासिक पाळी बद्दल खुल्या ने बोलू शकत नाही. आजही कित्येक मुलींना गंधा सुती कपडा चा वापर करावा लागतो. आज पण आपल्या माता-भगिनी मासिक पाळी बद्दल बोलायला घाबरतात, मासिक पाळीला श्राप मानतात, बीमारी मानतात या सर्वाला जिम्मेदार कोण?
👉आपणच आहोत ना कारण आपण कधी या गोष्टीबद्दल खुल्याने बोल्लोच नाही.
👉 चला तर दोस्तो मासिक पाळी वर बोलू काही!
👉जेव्हा मुलीला तिचा पहिला मासिक पाळी येते तेव्हा तिला तिची आई, बहीण तिला सांगते की तुझ्या शरीरातील ही एक गंदगी आहे. तिला निघून जाऊदे यातूनच खरा घोड होत. कारण की मासिक पाळी ही गंदगी नाही तर आपल्या मानवाच्या अस्तित्वाला टिकवून ठेवण्याची एक साधन आहे.
👉स्त्रीची निर्मिती प्रकृतीने अस तयार केली कि मानवाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता तिला त्रास सहन करावा लागतो. परंतु तिच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तिला होणारा त्रासला समजून घेत नाही. तिला आपुलकी देत नाही, तिला श्रापित म्हणतात, तिला वेगळे बसवतात, अपवित्र मानतात हे सर्व चुकीचे आहे हे आपल्याला कधी कडणार ?
🙏आज 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्य मासिक पाळीच्या 4 दिवसात घ्यायची काळजी,आहार आणि आरोग्य या बाबत मेघा वानखेडे फॅकल्टी सीपेट चंद्रपूर यांनी बनवलेले हे बोलके डूडल..
👉जगातील ती शाळेत जाणारी, कॉलेजमध्ये जाणारी, धुणे भांडे करणारी, लेकराला पाठीशी बांधून सिग्नलवर वस्तू विकणारी, ती अधिकारी, ती घर सांभाळणारी, संसार आणि नोकरी दोन्ही सांभाळताना स्त्रीपणच्या ओझ्याखाली हरवलेली, ती प्रत्येक स्त्री. तिचा दिनक्रम ठरलेला असतो.
रोजचा दिनक्रम सारकाही सांभाळतानाही तिच्या चेहर्यावर नेहमी एक गोडस हसू असते .
पण महिन्यातले ते चार दिवस जवळ येताच सुरू होणारा प्रचंड मनस्ताप, चिडचिड, कधी इतकी सकारात्मक ऊर्जा तर कधी निराशेचे गडद ढग, मनाच्या दुखण्याबरोबर शरीराच दुखणही वेगळच पण जगाशी भिडताना ती बाजूला ठेवते तीच दुखण, सार सहन करते.
ती कसलीही तक्रार न करता दिनचर्या पूर्ण करते व घर सांभाळून आपली नोकरीही सांभाळते. तेव्हा तिला काय हवं असतं?
👉तेव्हा तिला काय हव असत?
👉तर मायेचे, आपुलकीचे दोन शब्द, बरी आहेस ना तू, काळजी करू नको मी आहे ना सोबत. घरातली काम आपण दोघ मिळून करूया पण त्या चार दिवसात तू मात्र पूर्णपणे आराम कर नवऱ्याने बायकोसाठी, भावाने बहिणीसाठी इतकही केल ना तर ती राहील शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी.
👉शेवटी एक निरोगी समाज घडवायचा असेल तर त्यानेही जपायला हव तीच शारीरिक व मानसिक आरोग्य आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्या चार दिवसाबद्दल आपण मोकळेपणाने व्यक्त होऊ म्हणुनच,
तिच्या आयुष्यात दर महिन्याला
येणार्या त्या "चार दिवसावर"
जेव्हा "चार - चौघात"
मोकळेपणाने बोलण्यात येईल
तेव्हा निसर्गाच्या या चक्राच
सौंदर्य परिपूर्ण होईल.
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉक तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा करिता प्रेरित करतो.जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ही माहिती तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहचवा.
👉तुमची बातमी प्रकाशित करण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटीचा प्रतिनिधी होण्याकरिता व ब्लॅक गोल्ड सिटी च्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्या करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:-
Post a Comment