गोंडपिपरी :-
चंद्रपूर मधील गोंडपिपरी तालुका विठ्ठलवाडा गावातील ही घटना आहे. विठ्ठलवाडा गावातील मृत तरुणीचे नाव विना दादाजी पिंपळशेंडे होत. अभ्यासात हुशार व सर्वात अव्वल असणारी, सर्वांशी मिळून मिसळून राहणारी ही 23 वर्षीय तरुणीने अचानक आत्महत्या केल्यामुळे तिच्या आई-वडिलांवर दुःखाच आभाळ कोसळलं आहे. या घटनेनंतर गावामध्ये खरबडी माचलेली आहे.
विनाला पोलीस दलामध्ये भरती व्हायची इच्छा होती. त्या करिता चंद्रपूरमध्ये क्लासेस लावून अभ्यास करत होती. परंतु कोरोना महामारी आल्यामुळे सर्वांना घरी परत यावे लागले तसेच तिलाही आपल्या गावी परत यावे लागले. गावी आल्यानंतर वीना शेतातले काम करून अभ्यासही करत होती.
विनाचे आई वडील सुद्धा तिला अभ्यासाकरिता प्रेरित करत होते. तिच्या घरी आई वडील व तिला एक लहान भाऊ होता. हे सर्व ठीक असतानाही तिने आत्महत्या का केली हा सर्वात मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे. तिच्या मनात काय चालले होतं कुणालाच कळलं नाही.
👉दिनांक 1 जून 2021 रात्रीला घरची सर्व व्यक्ती झोपायला गेल्यानंतर. विना सुद्धा आपल्या खोलीमध्ये गेली. वीणाने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला व जीवन संपविण्याचे निर्णय घेतला. तिने आपल्या गळ्याला फाशी लावून आत्महत्या केली. तिच्या मनात काय चाललं होतं कोणालाच समजलं नाही.
👉दिनांक 2 जून 2021 च्या पहाटेला तिच्या घरचे सर्वजण उठले होते. मात्र ती तिच्या खोलीतून ती उठली नाही आतापर्यंत झोपून आहे. आईला असं वाटलं! तिला उठायला तिची आई तिच्या खोली जवळ आली तिचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा आतून लावून असल्यामुळे दरवाजा काही उघडला नाही.
👉त्यानंतर तिच्या आईने तिला खिडकीतून जाऊन बघितले तर काय तिच्या मुलीने आपल्या गळ्याला फास लावला होता. तिचा जीव गेला होता जसं तिला हे कळलं तसेच तिने आरडाओरडा सुरू केला. यामुळे सर्वजण सर्वजण याची माहिती झाली.
👉गोंडपिपरी पोलिसांना या बद्दल लवकरच माहिती पोचविण्यात आली व त्वरित पोलिस तिथे पोहोचले व मृत वीणाला पोस्टमार्टम करिता जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.
समोरची कारवाई गोंडपिपरी पोलिस करतील व तिच्या मृत्यू मागील कारण काय आहे हे आपल्याला लवकरच माहित पडेल.
🙏आपल्या प्रियजनांची काळजी घ्या त्यांचा सांभाळ करा व त्यांच्या सुख दुःखात सोबत राहा. त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील ते जाणून घ्या ते सोडविण्याचा प्रयत्न करा यातूनच आणखी एका कोणाला आत्महत्या करण्यापासून थांबवू शकतो.
👉 Warning sing and symptoms of suicidal person / (आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती चे चिन्ह लक्षणे.)
१) थेट किंवा अप्रत्यक्ष आत्महत्या करण्याच्या धमक्या.
उदाहरण:- माझी इच्छा आहे की मी झोपेल आणि कधी जागे होऊ नये.
२) आत्महत्या नोट, सोशल मीडिया पोस्ट
३) वागणुकीत बदल होणे, झोपेत व जेवणात बदल होणे इतयादी.
४) मूडमध्ये अत्यंत बदल होणे.
५) सगळ्यांपासून वेगळे राहणे.
६) आपली उरलेली सर्व कामे पूर्ण करणे जसे की कोणाचं कर्ज असेल ते फेडणे व इत्यादी.
७) समाजातून वेगळे होणे.
व इत्यादी चिन्हे लक्षणेने आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे राहू शकतात. विस्तारित माहिती करिता गुगल वर सर्च करा.
आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉक तुमच्या पर्यंत पोचविणे करिता प्रेरित करतात.
Post a Comment