image credit to pixabay
नागपूर:- नागपुर मधील मानकपुुर, एकात्मता नगर ची घटना आहे. नागपूर क्राईम ब्रांच ची युनिट टू ला गोपनीय माहिती मिळाली होती की एका घरामध्ये नकली नोटा छापण्याचा कारखाना चालत आहे. जसे त्यांना याबद्दल माहिती झाली तसेच त्यांनी त्या घरावर छापा मारला नकली नोट बनवणाऱ्या गॅंगचा पर्दा फाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्या गॅंग कडून कम्प्युटर सोबत प्रिंटर काही नकली नोट ही ताब्यात करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच गिट्टीखदान पोलीस अंतर्गत ठिकाणी चोरीचा बाब! समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी निलेश कडवे या आरोपीला अटक केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान निलेश कडवे यांनी नकली नोटा छापण्याचा गुन्हा कबुल केला. व त्यानंतर पोलिसांनी मानकापूर मधील एकात्मता नगर मधील एका भाड्याच्या खोलीत पोलिसांनी छापा मारून आरोपींना अटक केली.
त्यादरम्यान पोलिसांना आरोपी च्या खोलीत कम्प्युटर्स सहित प्रिंटर सापडले व त्यासोबतच 100₹,50₹,10₹, 20 ₹ चे नोटा सापडलेत व त्या सर्व बनावटी नोटांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या प्रकरणात त्याचा दुसरे साथीदार मारुख खान, रफिक खान या दोघांनाही अटक करण्यात आली.
आरोपी मागील तीन महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचे काम भाड्याच्या घरात करत होते.
आरोपी यांनी युट्युब वर बघून नकली नोट बनविण्याच शिकले होते. सुमारे दोन महिने त्यांनी नकली नोट बनविण्याकरिता सरावही केला होता.
पोलिस अद्याप तपास करत आहेत की आरोपींनी बाजारात किती नोटा चालवल्या? आणि कुठे व कधी त्यांनी या नोटा खपल्या आहेत हे सुद्धा पोलिस शोध घेत आहे. पोलीस त्यांच्या इतर साथीदारांचा सुद्धा शोध घेत आहे.
आजची ही बातमी येथेच संपली भेटूया पुढच्या अश्या तळपत्या भडकत्या बातमीसोबत.
तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुमचा एक सकारात्मक कमेंट आम्हाला असेच ब्लॉक तुमच्या पर्यंत पोचविणे करिता प्रेरित करतो.
ब्लॅक गोल्ड सिटीचा प्रतिनिधी होण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्या करिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा
👉Click here
बातमी प्रकाशित करण्याकरिता आम्हाला संपर्क करा.
Post a Comment