नागपूर:- नागपूर येथील कोंढाळा पोलीस स्थानकावर समोरील ही घटना आहे. एका ट्रक चालकाने पोलीस स्थानकासमोर गड फास घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आज दिनांक 15 जूनला समोर आली आहे. या ट्रक चालकावर नुकतच चोरीच्या आरोपाखाली 14 जूनला कोंढाळी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि पोलीस सुद्धा त्या ट्रक चालकाचा शोध घेत होते.
ट्रक चालकाचे नाव अशोक जितूलाल नागोत्रा वय 40 वर्ष असून 9 जून रोजी अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजार गाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिपे चोरी गेले होते. अशोक नागोत्रा आपल्या ट्रक मध्ये तेलाचे पिपे लोड करून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर ट्रान्सपोर्ट मालकांनी या घटनेबद्दल पोलिसाला पाच दिवसानंतर (१४ जून ) माहिती दिली व त्यानंतर अशोक मागोत्रा यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरू झाले. पोलिसांनी यांचा रात्रभर शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत.
मात्र आज दिनांक 15 जून ला सकाळी पोलिस स्थानकासमोर उभे असलेल्या ट्रकवर अशोक नागोत्रा यांनी स्वतःला गळफास केलेल्या अवस्थेत सापडले. पोलीस सध्या घटनास्थळी चौकशी करत आहे.
Post a Comment